पुणे विभाग

ऐन हिवाळ्यात बेल्ह्यात पूर; रस्त्यावर पाणीच पाणी

बेल्हे | सुधाकर सैद : बेल्हे बाह्य वळण ते बेल्हे गावात येणाऱ्या रस्त्यावर पुराच्या पाण्यासारखे पाणी वाहत असल्याचे दिसून येत असून त्या पाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेजारी राहणाऱ्या दुकानदार व व्यवसायिकांना त्रास होत आहे.
पिंपळगाव जोगा कालव्याच्या चाऱ्यांचा प्रश्न अर्धवट असल्याने हे कालव्याच्या माध्यमातून चारीला सोडलेले पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, कारण शेतकऱ्यांनीच विरोध केल्यामुळे चाऱ्या अर्धवट राहिल्या आहेत. याचा परिणाम असा होतो की येथील २८ नंबर चारीला सोडलेले पाणी बेल्हे बाह्यवळण मार्गावरून गावात येणाऱ्या रस्त्याच्या कडेने असणाऱ्या गटारातून ओढ्यात जाते व ओढ्यातून शेवटी नदीपर्यंत जाते परंतु या रस्त्याच्या कडेला शरद बँकेच्या शेजारी असणाऱ्या गटारात टाकलेल्या पाईपलाईन मध्ये प्लॅस्टिक, माती व इतर वस्तूमुळे बंद झाल्यामुळे त्या ठिकाणचे पाणी सरळ रस्त्यावर आल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, पादचारी, वाहने यांना त्रास होत असून रस्त्याचाही रस्त्यालाही खड्डे पडायला सुरुवात झाली असून या सर्व प्रकाराला जबाबदार कोण ???

वीडिओ पाहण्यासाठी टॅप करा

तसेच याची दुसरी बाजू अशी की, पिंपळगाव जोगा कालव्याला सोडलेल्या आवर्तनामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होत असून या पाण्यामुळे ओढे, नाले, बंधारे, विहिरी, कुपनलिका यांचा पाण्याचा जलस्तर वाढणार असल्यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, परंतु पिंपळगाव जोगा कालव्याच्या चाऱ्यांचा प्रश्न अर्धवट असल्याने हे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही कारण शेतकऱ्यांनीच विरोध केल्यामुळे चाऱ्या अर्धवट राहिल्या आहेत. या संदर्भात बेल्हे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष कैलास औटी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर पिंगट, हरिभाऊ गुंजाळ, संजय बोरचटे, सौरभ गुंजाळ, संतोष चाटे, गणेश बांगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यासंदर्भात पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे उत्तर दिले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या अपूर्ण असलेल्या चारीला आम्ही पाणी सोडले असून पाणी रस्त्यावर आले आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही असे असेल तर आम्ही लगेच चारीचे पाणी बंद करत आहोत असे उत्तर मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button