आळेफाटा येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची १९४ वी पुण्यतिथी

समर्थ भारत वृत्तसेवा
आळेफाटा दि. ३ – आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची १९४ वी पुण्यतिथी निमित्त आळेफाटा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करून कार्याचा गौरव करण्यात आला.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक समिती आळे, आळेफाटा, वडगाव आनंद यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त आळेफाटा चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यालगत आकर्षक सजावट करण्यात आली होती. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास व राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गणेश गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले. तर शुभम गाढवे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्या विषयी माहिती दिली. सचिन वाळुंज, गिरीष कोकणे, अँड विजय कु-हाडे, मंगेश काकडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, गणेश कवडे, नवनाथ वाळुंज, प्रदीप देवकर यांनी अभिवादन केले. सर्व सामान्यांना एकत्र करून राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा उभारला आणि ३ फेब्रुवारी १८३२ रोजी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली दिली. यामुळे राजे उमाजी नाईक एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे यावेळेस भाषणातून सांगितले.
यावेळेस आळे गावचे सरपंच मुकुंद भंडलकर,माजी सरपंच प्रीतम काळे वडगाव आनंद,उपसरपंच गणेश भुजबळ, पं.समिती सदस्य जीवन शिंदे, सागर लामखडे, बाळासाहेब देवकर (नेते ),उदय पाटील भुजबळ, कैलास वाळुंज, तुषार कु-हाडे, राजु चौगुले, भाजप नेते निलेश भुजबळ,धोंडिभाऊ भंडलकर, बबलू भंडलकर, गणेश गोफणे, विपुल येलमर, नंदु भंडलकर, नवनाथ मोरे, कैलास शिरतर, शशिकांत शिरतर, कैलास शिरतर, केदार चव्हाण, अरूण शिरतर, संदीप शितोळे, मयूर भंडलकर,पांडू बोऱ्हाडे, जितेंद्र भंडलकर, नानासाहेब भंडलकर, रोहिदास मोरे, विनय भंडलकर,किसन भंडलकर व समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आळे ग्रामपंचायत कार्यालयात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.



