पुणे विभाग

गद्दारांनी राजाभाऊंचा फोटो व नाव वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करणार- मयूर गुंजाळ

बेल्हे | सुधाकर सैद : येथील शिवसेना शिवसेना शाखेत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी मयूर गुंजाळ यांनी शिवसेना उबाठा सोडून गेलेल्या गद्दारांना माझ्या वडिलांचा म्हणजेच राजाभाऊ गुंजाळ यांचे नाव व फोटो वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

यावेळी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दिलीप बाम्हणे, संभाजी तांबे, मयूर गुंजाळ, शांताराम सावंत, पांडुरंग गाडेकर, नारायण खुटाळ यांनी मार्गदर्शन करताना आम्ही राजाभाऊंचे म्हणजेच शिवसेना उबाठा गटाचे खंदे समर्थक आणि कट्टर शिवसैनिक असून हा गट सोडून गेलेले हे शंभर टक्के गद्दारच आहेत आणि जात असताना यांनी आमच्या कोणाशीही विचार विनिमय केला नसून यांना राजाभाऊ गुंजाळ यांचा फोटो व नाव वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. आज राजाभाऊ असते तर हे कुठेच नसते जे आज स्वतःला स्वयंघोषित नेते समजत आहेत. राजाभाऊ गुंजाळ हे तळागाळाततील सर्वसामान्य शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत होते, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर लालसेपोटी गेलेल्या बेल्हे-राजुरी गटातील या दोन-चार गद्दारांना माझा निर्वाणीचा इशारा आहे की माझ्या वडिलांचे नाव व फोटो वापरू नये अन्यथा मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मयूर गुंजाळ दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button