पुणे विभागमहाराष्ट्रराजकीय

गुलाब पारखेंचा पाय खोलात.!

खंडणी आणि जमीन घोटाळा प्रकरण भोवणार!

जुन्नर दि. ३ : राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे निवडणूक लढवत आहेत. मात्र एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रकारावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. याशिवाय तालुक्यातील एका आकारी पड जमीन त्यांच्या पत्नीच्या नावे केल्याचे प्रकरणी विनोद भगत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गुलाब पारखे यांचे चिरंजीव चेतन पारखे यांच्या कथित फोनवरील धमकी प्रकरण देखील समोर आल्याने सावरगाव कुसूर गटातील मतदार त्यांच्यापासून दुरावला असल्याचे बोलले जात आहे. एकूणच पारखे कुटुंबीय पैशांच्या जोरावर लोकांना मदत करून निवडणुका जिंकतात आणि त्यानंतर मतदारांना धमकावतात असा सूर या जिल्हा परिषद गटात उमटताना पहायला मिळत आहे.
गुलाब पारखे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना आर्थिक मदत करतात आणि इतर वेळी त्यांना मतदारांचा विसर पडतो. मतदारांना त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, त्यांच्या समस्या सोडविणारा नेता हवा आहे; पैशांच्या जोरावर मतदारांना निवडणूक काळात भुलविणारा आणि आपलं काम झाल्यावर मतदारांना विसरणारा नेता या गटात नको असं म्हणत या गटातील मतदार आता कामाच्या माणसालाच मतदार करणार असंही मतदार बोलू लागले आहेत.
काय आहे कथित जमीन अपहार प्रकरण?
जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे येथील येथील १९३० पासून असलेला सरकारी पड भूखंड वारसाहक्काने गुलाब पारखे यांच्या पत्नी साधना पारखे यांच्या नावे झाल्याची नोंद करण्यात आली. याविरोधात विनोद भगत आणि इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेत ही सरकारी पड जमीन पारखे यांनी लाटली असल्याची याचिका दाखल केल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.
काय आहे खंडणी प्रकरण?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button