पुणे विभागमहाराष्ट्रराजकीय

प्रशांत अभंगच मारणार जिल्हा परिषदेचं मैदान : हिंगे

मंचर दि. ३ : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक – पिंपळगाव तर्फे महाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आघाडीचे उमेदवार प्रशांत विठ्ठल अभंग यांनी प्रचारात आघाडी घेतली असून; या जिल्हा परिषद गटात अनेक स्थानिक नेत्यांना, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांना त्यांनी आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुमार हिंगे यांनी म्हटलं आहे.
प्रशांत अभंग हे प्रतिथयश उद्योजक , दानशूर आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या सोबत सर्वसामान्य नागरिक जोडला गेला आहे. प्रशांत अभंग यांनी स्वतःच्या व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून कोट्यावधी रुपयांचा धर्मादाय केला असून; समोरच्या उमेदवाराप्रमाणे त्यांच्यावर कोणत्याही गैरव्यवहाराचे आरोप नाहीत. ते कोणालाही सहज उपलब्ध होतात तसेच त्यांचे चारित्र्य स्वच्छ असल्यामुळे या जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे आकर्षित होताना पाहायला मिळत असल्याचेही हिंगे यांनी म्हटले आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवाराने पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या  
प्रशांत अभंग यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने याच जिल्हा परिषद गटातील अनेक तरुणांना नोकरीला लावत असताना त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोपही कुमार हिंगे यांनी केला आहे. संबंधित उमेदवाराने आपल्या गावातील शाळेची जागा हडपण्याचा देखील प्रयत्न केला असून या संदर्भात त्यांच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये देखील रोष असल्याचे कुमार हिंगे यांनी म्हटले आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवाराला टक्केवारीसाठी सत्ता हवी 
प्रशांत अभंग यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे ठेकेदारांचे लांगुलचालन करणारे व्यक्तिमत्व असून; विकास कामांमध्ये मिळणाऱ्या टक्केवारीवर त्यांचा डोळा असल्याचेही हिंगे यांनी म्हटले आहे. याउलट प्रशांत अभंग हे प्रचंड नीतिमत्ता असलेले आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून; त्यांना अशा पद्धतीने मिळणाऱ्या गोष्टींमध्ये काडीचेही स्वारस्य नाही त्यामुळे या जिल्हा परिषद गटातील मतदार यावेळी प्रशांत अभंग यांच्याच पाठीशी असून; प्रशांत अभंगच जिल्हा परिषदेचे मैदान मारणार असल्याचे कुमार हिंगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button