पुणे विभागमहाराष्ट्रराजकीय

प्रशांत अभंग हजारोंच्या मताधिक्याने निवडून येणार

आघाडीच्या कार्यकर्त्यांना विश्वास

अवसरी दि. २ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना(शिंदे) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीचे अवसरी बुद्रुक – पिंपळगाव तर्फे महाळुंगे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांत अभंग यांना या जिल्हा परिषद गटातून हजारोंच्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास संबंधित तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे.
प्रशांत अभंग हे राजकारणात जरी नवखे असले तरी; ते अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असल्याने ते संपूर्ण आंबेगाव तालुक्याला परिचित आहेत. प्रशांत अभंग यांनी आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून कोट्यावधींची कामे केली आहेत. त्यांच्या या कार्याचा सबंध आंबेगाव तालुक्यात बोलबाला आहे. अभंग यांच्या दानशूर वृत्तीमुळे आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांचा तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे. यामुळेच प्रशांत अभंग यांच्या नावाला आघाडीच्या सर्व पक्षांनी संमती दिली.
मनमानीला पर्याय प्रशांत अभंग 
प्रशांत अभंग यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे कमालीचे हेकेखोर आणि मनमानी पध्दतीनं काम करणारे तसेच अनेक गैरव्यवहारांचे आरोप असलेले आहेत. त्यांच्याच गावातील लोक त्यांच्या मनमानीला कंटाळले असल्याचे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
प्रशांत अभंग यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी असणारे राजू शिंदे सांगतात की; प्रशांत अभंग यांचा शिस्तप्रिय स्वभाव आणि दानशूर वृत्तीमुळे अभंग हे राजकारणपालीकडचे इन्फ्लुएन्सर ठरले आहेत. तालुक्यातील हजारो लोक त्यांना फॉलो करतात. त्यात त्यांच्या सोबत तीन पक्षांची ताकद आहे त्यामुळे प्रशांत अभंग हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button