पुणे विभागमहाराष्ट्रसामाजिक
निर्णय संस्थेचा; आरोप देणगीदारावर; अवसरीकर संतापले
राजकीय आसुयेपोटी अभंगांवर आरोप; विरोधी नेत्याने तोडले अकलेचे तारे

अवसरी | प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवनाथ विद्यालय आहे. या विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. हे विद्यालय १९५९ मध्ये सुरू करण्यात आले होते. १९८४ मध्ये या विद्यालयात MCVC (रोजगाराभिमुख किमान कौशल्यधारीत कोर्स) सुरू करण्यात आले १९९१ – मध्ये तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. १९५७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या विद्यालयाच्या इमारतीची अनेकदा डागडुजी करण्यात आली. तब्बल ५० – ६० वर्षांपासून सुरू असणाऱ्या या विद्यालयात कालपरत्वे भौतिक सुविधा कमी पडत चालल्या होत्या. यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेत येथील उद्योजक प्रशांत अभंग यांच्या सहकार्यानं अनेक उपक्रम सुरू केले.
विद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमुळे अतिरिक्त वर्ग सुरू झाले होते; विद्यार्थी संख्या वाढली होती. या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गांची आवश्यकता होती. ही गरज ओळखून गावातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दगडू मारुती शिंदे, शरदराव शिंदे आणि अनेक जागरूक पालकांनी याच गावातील उद्योजक प्रशांत अभंग यांना याबाबत सांगितले आणि त्यानंतर प्रशांत अभंग यांनी या नवीन इमारतीसाठी, कोर्सेसाठी तब्बल ७१ लाख रुपयांची देणगी आणि कॉम्प्युटर लॅब, वाचनालय, प्रयोग शाळा अशा अनेक कामांसाठी जवळपास ३० लाखांची वाढीव मदतही केली. याशिवाय विविध संस्थांकडूनही मदत मिळवून दिली. १ कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत करणाऱ्या प्रशांत यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी संस्थेने या नवीन इमारतीला प्रशांत अभंग यांच्या मातोश्री सौ. वनिता विठ्ठल अभंग यांचे नाव दिले.
अवसरी खुर्द येथे उभारलेल्या या सुसज्ज इमारतीमध्ये कौशल्य विकास आणि तंत्र शिक्षणासोबतच विद्यान शाखेचे कनिष्ठ महाविलय सुरू करावे असा निर्णय रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक प्रतिनिधींनी घेतला आणि येथे स्वयं अर्थसाह्य तत्वावर हे विद्यालय सुरू करण्यात आले. काही वर्ष हे विद्यालय चालविल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या मंचर आणि अवसरी बुद्रुक, पेठ आदी ठिकाणच्या विज्ञान शाखांमध्ये विद्यार्थी कमी पडू लागल्याने सर्वानुमते भैरवनाथ विद्यालय अवसरी येथे कौशल्य विकास आणि तंत्रशिक्षण विभागच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय रयत शिक्षण संस्था, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी घेतला.
अलीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. राजकारणी मंडळी आपलं उखळ पांढरं करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. हे करत असताना त्यानं आपण आपल्या राष्ट्राचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच नुकसान करतोय याचेही भान राहत नाही. असाच काहीसा प्रकार अवसरी खुर्द येथील या विद्यालयाच्या बाबतीत झाला आहे. एका राजकीय पुढाऱ्याने शिक्षण संस्थेचा हा निर्णय थेट कोट्यावधींची देणगी देणाऱ्या प्रशांत अभंग यांचेच अपयश असल्याचे सांगून टाकले.
राजकीय फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांची बदनामी
आपल्या पक्षातील उमेदवाराच्या राजकीय नेत्याने केवळ आपल्या पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी विरोधी उमेदवाराला बदनाम करण्याच्या प्रयत्नात रयत शिक्षण संस्थेसारख्या एका नामांकित संस्थेला बदनाम करून टाकल्याने अवसरी खुर्द येथील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि जागरूक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी देशाच्या उन्नतीचा पाया असणार शैक्षणिक संस्थांना बदनाम करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणणे हा अतिशय वाईट प्रकार असून यामुळे आपल्याच गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल याचीही तमा न बाळगणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांकडून विकास कामांच्या वल्गना केल्या जातात; मात्र त्यांच्या राजकीय फायद्याच्या आड जर कोणी आलं तर ते समाज आणि राष्ट्रहितही विसरून जातात असंही ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
विद्यालय चालूच आहे : शरदराव शिंदे
याबाबत अवसरी खुर्द येथील नागरी शरद शिंदे यांनी असं म्हटलंय की, रयत शिक्षण संस्थेच्या सौ. वनिता विठ्ठल अभंग तांत्रिक किमान कौशल्य विद्यालय आजही चालू असून येथे ५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.



