पुणे विभागराजकीय

अखेर अरुण गिरेंचा अर्ज दाखल; शिवसेनेकडून अरुण गिरे यांचे राष्ट्रवादीच्या विवेक वळसेंना आव्हान


घोडेगाव | प्रतिनिधी :
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष अरुण गोविंदराव गिरे यांनी शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे अधिकृतरीत्या दाखल केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना नेते रमेश येवले, उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, सरपंच रवींद्र वळसे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आजची गर्दी अन उत्साह पाहता विजय निश्चित असल्याचे शिक्कामोर्तब झाले. अरुण गिरे यांनी जनतेच्या विश्वासावर विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करून शिवसेनेच्या ध्येयधोरणांनुसार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, ग्रामीण विकासाला गती देणे व पारदर्शक कारभार करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असा विश्वास व्यक्त केला.

अरुण गिरे जुन्या फॉर्ममधे 

शिवसेनेचे उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा त्यांच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाचा काळात आंबेगाव तालुक्यासह जिल्हाभरात मोठा प्रभाव होता. तरुणांकडून अबाल वृद्धांपर्यंत समरस होणारे अरुण गिरे हे एकमेव नेते होते असं आजही अनेकजण बोलतात. मधील काळात राष्ट्रवादीपासून बाजूला जाऊन आणि पुन्हा राष्ट्रवादी परतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला म्हणावा असा स्कोप मिळाला नव्हता; त्यातच माजी मंत्री वळसे पाटील यांच्या मागे त्यांची प्रतिमा टप्प्यात येत नव्हती मात्र आता त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याने तसेच समोर असणाऱ्या नेत्याची भिंत हटल्याने त्यांच्यासोबत मोठा कार्यकर्ता वर्ग जोडला जात आहे; त्यामुळे अरुण गिरे आपल्या जुन्या फॉर्मात असल्यासारखे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button