पुणे विभाग

अनधिकृत जाहिरात फलक व फ्लेक्स बोर्ड काढले; बेल्हे बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास

समर्थ भारतच्या बातमीचा परिणाम

बेल्हे | सुधाकर सैद : शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी समर्थ भारत मध्ये आलेल्या बातमीचा योग्य तो परिणाम झाला असून बेल्हे येथील एसटी बसस्थानकाच्या दर्शनी भागावर आणि भिंतीवर अनधिकृतपणे लावलेले पोस्टर्स, बॅनर्स आणि जाहिरातींचे फलक हटवल्यामुळे स्थानकाचा मूळ चेहरा आता स्पष्ट दिसू लागला असून, प्रवाशांना बसण्यासाठी मोकळी जागा मिळाली आहे. एसटी बसस्थानकाच्या खांबावर आणि प्रवेशद्वारावर असलेले मोठमोठे फलक काढल्यामुळे प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी व बसण्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाली असून गुदमरलेल्या एसटी बसस्थानकनेही मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.

जाहिरातींच्या मागे साचलेली धूळ आणि कचरा आता साफ करणे सोपे झाले असून, स्थानक आता अधिक मोकळे, सुंदर आणि नीटनेटके दिसत असून अनधिकृत जाहिरातींचा विळखा काढल्यामुळे प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले असून, बेल्हे एसटी बसस्थानकाचा परिसर आता खऱ्या अर्थाने ‘मोकळा श्वास’ घेत आहे.


फ्लेक्सच्या विळख्यात सापडेलेले बेल्हे बस स्थानक 

काही दिवसांपूर्वी बेल्हे येथील बस स्थानक फ्लेक्सच्या विळख्यात असल्याबाबत समर्थ भारतने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर संबंधित यंत्रणेने येथील अनधिकृत जाहिरात फलक आणि फ्लेक्स हटवून बस स्थानक मोकळे केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button