पुणे विभागराजकीय

घोडेगाव-पेठ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती साठी शिवसेनेचे अर्ज दाखल

 

घोडेगाव | प्रतिनिधी : घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सुवर्णा देविदास दरेकर तसेच घोडेगाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार कपिल काळे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आज आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे अधिकृतरीत्या दाखल केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आजची गर्दी अन उत्साह पाहता विजय निश्चित असल्याचे शिक्कामोर्तब झाले. दोन्ही उमेदवारांनी जनतेच्या विश्वासावर विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करून शिवसेनेच्या ध्येयधोरणांनुसार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, ग्रामीण विकासाला गती देणे व पारदर्शक कारभार करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button