पुणे विभागसामाजिक

इंद्रायणी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार ; आळंदीत अभियान उत्साहात

आळंदी : इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आळंदी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या उपक्रमात एन.एस.एस. विभागातील विद्यार्थी व स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नदीघाट तसेच नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक व टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबत स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात मोलाचा सहभाग नोंदवल्याबद्दल महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाचा आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो तसेच लेखक शरद बाविस्कर लिखित ‘भूरा’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे त्यांनी कौतुक करत, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे नमूद केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व एन.एस.एस विभागाचे नगरपरिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button