पुणे विभागमहाराष्ट्रसामाजिक

बेल्हे जिल्हा परिषद शाळेत सुसज्ज अत्याधुनिक एआय लॅब व ग्रंथालय लोकार्पण सोहळा संपन्न

बेल्हे (सुधाकर सैद) ता. २५: येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे शुक्रवार दिनांक 24 रोजी संध्याकाळी कै. सौ. यमुनाबाई सिताराम चौरे यांच्या स्मरणार्थ सुसज्ज अत्याधुनिक एआय व यमुनाबाई चोरे ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व बेल्हे गावचे सुपुत्र तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या शुभहस्ते पार पडला.

या सर्व एआय लॅब व ग्रंथालयाचा संपूर्ण १८ लाख रुपये खर्च बेल्हे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी सुनील चोरे, त्यांच्या सुविध्य पत्नी डॉ. विद्या चोरे व शिवनेरी न्यूज चॅनलचे संपादक गणेश चोरे यांनी केल्याचे समजते, तसेच यावेळी त्यांनी आपल्या वडिलांची ग्रंथतुला करून, सर्व पुस्तके जिल्हा परिषद शाळेला भेट स्वरूपात दिली व विद्यार्थ्यांना वाचनाची एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली.

या कार्यक्रम प्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतीक चन्नवार, गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, नवी मुंबई येथील उद्योजक नारायण चोरे व अशोक बेल्हेकर, आशीर्वाद ग्रोथ फाऊंडेशनच्या संचालिका अंजली साठे, सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या संचालिका विद्या चोरे, बेल्हे राजुरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट, बेल्हेच्या सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच नवनाथ शिरतर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम मुंजाळ, उपाध्यक्षा वैशाली मटाले व इतर सदस्य, ग्रामविकास अधिकारी किशोर रायसिंग वाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर, ग्रामस्थ तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button