नाशिक विभाग

आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पालकमंत्र्यांवर आरोप : आ. दाते

 

पारनेर | प्रतिनिधी : पारनेर शहराची पाणीपुरवठा योजना पालकमंत्र्यांनी अडवली असल्याचा आरोप हा स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असुन पारनेर शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटीलांनी योजना अडवली असल्याचे खोटे आरोप केले जात असून, हा प्रकार म्हणजे स्वतःच्या नाकर्तेपणावर पडदा टाकण्यासाठी केलेला केविलवाणा आणि दिशाभूल करणारा प्रयत्न असल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी केले. प्रत्यक्षात आमदार काशिनाथ दाते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पारनेर शहरासाठी मागिल एक वर्षात १८ कोटी ७१ लक्ष रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला असून, या सर्व कामांना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची मोलाची साथ व सहकार्य लाभलेले आहे.विकासकामांना निधी उपलब्ध करून देताना पालकमंत्र्यांनी कधीही दुजाभाव केला नाही, ही वस्तुस्थिती जनतेला माहीत आहे. पारनेर शहराचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विशेष मदत केली असल्याचेही आ. दाते यांनी सांगितले.

दुर्दैवाने आमदार दाते यांच्या माध्यमातून शहरासाठी मंजूर झालेली अनेक विकासकामे पारनेर नगरपंचायतमधील सत्ताधारी मंडळींनी राजकीय द्वेषापोटी अडवून ठेवली आहेत. यामुळेच पारनेर शहराच्या विकासाला मोठी खीळ बसलेली असून, त्याची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याचा हा केवळ निष्फळ प्रयत्न आहे. आज पारनेर नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व हे आमदारपद भूषवून, तसेच राज्यात सत्तेत असतानाही त्यांनी पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी नेमके कोणते ठोस प्रयत्न केले, हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. पारनेर शहराला पाणी आणल्याशिवाय पारनेर शहरात पाय ठेवणार नाही आणि मतही मागायला येणार नाही, सत्ता असूनही जर मूलभूत गरज असलेली पाणी योजना पूर्ण करता आली नसेल, तर त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी इतरांवर आरोप करणे हे राजकीय अपरिपक्वतेचे द्योतक आहे. वसंतराव चेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पारनेर

 

पारनेर शहराचा विकास हा आमदार दाते यांचा प्रामाणिक ध्यास असून, राजकारणापेक्षा शहराच्या हिताला प्राधान्य देऊन ते सातत्याने काम करत आहेत. विकासकामांना अडथळे आणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि पारनेरच्या जनतेची दिशाभूल थांबवावी. पै. युवराज पठारे, नगरसेवक नगरपंचायत पारनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button