घोडेगाव येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

घोडेगाव | प्रतिनिधी: घोडेगाव येथे मकर संक्रांतीनिमित्त सुवर्णवेध फाऊंडेशन व मा.बी. डी. अण्णा काळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला-भगिनींसाठीच्या हळदी-कुंकू समारंभास भेट देऊन उपस्थित महिला-भगिनींना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख देवीदासजी दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा देविदास दरेकर व कपिल दिलीपराव काळे पाटील यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी मानसिक, शारीरिक व कौशल्य विकासाच्या दृष्टीने आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. सुवर्णा पगार-काळे, प्रोजेक्ट मॅनेजर मा. भगवान हरकाल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा मनीषा जारकर, के.व्ही.आय.सी. भारत सरकारचे प्रतिनिधी प्रफुल्ल रहाणे तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षक वामन सोपानराव बाजारे यांनी महिलांना आरोग्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व आर्थिक स्वावलंबन याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योती गाडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश थोरात, शिवसेना घोडेगाव शहरप्रमुख मनोज काळे यांच्यासह घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




