पुणे विभाग

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात पेटंट कार्यशाळा

ओझर प्रतिनिधी : ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने बौद्धिक संपदा अधिकार आणि पेटंट या विषयाबद्दलची कार्यशाळा डी.बी.टी. स्टार कॉलेज प्रकल्पांतर्गत दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केली होती, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एन. शिरसाट यांनी दिली. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन कर्माचाऱ्यांना पेटंट म्हणजे काय तसेच बौद्धिक संपदा अधिकार आणि त्याचे महत्त्व याबद्दल अवगत करणे, हा सदर कार्यशाळेचा हेतू होता.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. संजयकुमार रहांगडाले यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्व, पेटंट आणि बौद्धिक संपदा अधिकार याची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी पेटंट नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि पेटंट मिळाल्यानंतची प्रक्रिया यावर प्रकाश टाकला. आपल्या कल्पना व संशोधन यांचे तसेच आपण निर्माण केलेली संकल्पना आपल्याच नावाने नोंदली जाईल यासाठी बौद्धिक संपदा अधिकार कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीस पेटंट, किंवा कॉपीराईट करता येते. त्यासाठी आपली संकल्पना नवीनतम असावी लागते. या बौद्धिक संपदेचे रूपांतर नंतर आर्थिक संपदेत करता येते. म्हणूनच आपल्या बौद्धिक संपदेचे रक्षण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. संजयकुमार रहांगडाले यांनी केले.

वनस्पतिशास्त्र विभागाच्या डॉ. पवन हांडे यांनी संकल्पित केलेल्या “एअर सॅमपलर फॉर क्रॉप डिसीस फोरकास्टिंग” या उपकरणास् भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालायचे अंतर्गत येणाऱ्या उद्योग व व्यापार विभागाने भारतीय पेटंट नुकतेच बहाल केले आहे. त्यांचे कौतुक या प्रसंगी करण्यात आले. हे संशोधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे संशोधक डॉ. हांडे यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना संशोधनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या संकल्पना पेटंटमध्ये उतरवण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. के. डी. सोनवणे, गणित विभाग प्रमुख प्रा. एम. व्ही. देशमुख, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदिपान गव्हाळे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. जाधव, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. टी. पाडवी, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश्वर काळदंते वाणिज्य संशोधन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. एम. बी. खंदारे तसेच सहकारी शिक्षक डॉ. रमेश काशिदे, डॉ. राहुल पाटील, डॉ. किशोर काळदंते प्रा. अंकुश मोधे, प्रा.रमेश गोपाळे, प्रा. रत्नमाला मोरे, प्रा. स्वप्नाली दांगट, प्रा.श्वेता कुलकर्णी तसेच शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्रकुमार शेळके ,मिलिंद ढगे,नितीन गरुड,सचिन डुंबरे आदी उपस्थित होते. प्रा. मनोज देशमुख यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यानी आणि कर्मचाऱ्यानी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील सुरेश थोरात तसेच विद्या आढारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button