निकृष्ठ रस्त्याचे काम ग्रामस्थांकडून बंद

मंचर दि. ६ : कळंब येथील एका रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या कामाविरोधात ग्रामस्थांनी काम बंद पाडत ठेकेदाराविरोधात आंदोलन केले. रस्त्यावर योग्य प्रकारे खडी, डांबर न टाकता काम केले जात असल्यामुळे रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली.
अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून, निकृष्ट काम आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. ग्रामस्थांनी रस्त्याचे काम दर्जेदार व नियमांनुसारच करावे, अशी मागणी केली आहे.



