

अमरावती प्रतिनिधी | अमरावती महापालिका निवडणुकीत राजकीय चुरस वाढताना दिसत आहे. भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षामध्ये थेट सामना रंगला आहे. रवी राणा यांनी 32 जागांवर उमेदवार उभे केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उघडपणे मैदानात उतरल्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
या सगळ्यातच आता बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीला नवा ट्विस्ट मिळाला आहे. कट्टर विरोधक असतानाही बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचं उघडपणे कौतुक केलं आहे. वेळ आल्यास रवी राणा समोर आले तर शाल देऊन सत्कार करेन, असंही त्यांनी सांगितलं.
या घडामोडींमुळे अमरावतीच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न मतदारांसह राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. अमरावती महापालिका निवडणूक आता अधिकच रंगतदार होत चालली आहे.



