आळे गावच्या उपसरपंचपदी जयश्री डावखर बिनविरोध

बेल्हे; सुधाकर सैद: आळे गावच्या उपसरपंच पदी जयश्री सागर डावखर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीची घोषणा आळे गावचे सरपंच सखाराम (मुकुंद)भंडलकर व ग्रामविकास अधिकारी वनघरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी जयश्री डावखर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामविकास अधिकारी वनघरे यांनी केली.
यावेळी ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यालयात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व आळे गावचे माजी सरपंच प्रितम काळे, माजी उपसरपंच विजय कुऱ्हाडे, माजी सरपंच सविता भुजबळ, माजी उपसरपंच मंगेश कुऱ्हाडे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव लाड, दिगंबर घोडेकर, सुधाकर काळे, रज्जाउद्दीन मोमीन, ग्रामपंचायत सदस्या मंगल तितर, लता वाव्हळ, गौरी भंडलकर, सोनाली वाघुले, उर्मिला कुऱ्हाडे, ज्योती शिंदे, अर्चना गुंजाळ, सागर डावखर आणि ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
जयश्री डावखर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व विशेषतः महिलांसाठी काम करण्याचे आश्वासन दिले व बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.



