पुणे विभागराजकीय

अवसरी जिल्हा परिषद गटात गणेश गाडेंना वाढता पाठिंबा

 

पारगाव ता. आंबेगाव येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अनेक तरुणांनी हजेरी लावत गणेश गाडे यांनी अवसरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरत; या निवडणुकीत झोकून गाडे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्यात काही दिवसांतच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे त्या अनुषंगाने आंबेगाव तालुक्यामध्ये अवसरी- पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून युवा तरुण चेहरा म्हणून गणेश गाडे हे मैदानात उतरले आहेत. गणेश गाडे हे एक तरुण चेहरा असून युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वचा काम त्यांच्या माध्यमातून या आंबेगाव तालुक्यामध्ये चालू आहे या कामामुळे व बैलगाडा शर्यतीमुळे त्यांचा तरुणांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांची एन्ट्री झाल्यापासून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. गाडे यांना जिल्हा परिषद गटातून अनेक गावातून वाढता पाठिंबा मिळत आहे.

पारगाव येथे झालेल्या कोपरा सभेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात म्हणाले की,आपल्या सर्वांना आता एकत्र होऊन या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आपल्यातलाच तरुण,युवा सहकारी हा आपल्याला जिल्हा परिषद वरती निवडून द्यायचा आहे गणेश गाडे सोबत आम्ही सर्वजण आहोत कोणतीही अडचण येणार नाही आपण सर्वजण एकत्र लढून नक्कीच जिल्हा परिषद वरती गणेश गाडे यांना निवडून देऊ हा विश्वास मला तुमच्या सर्व तरुणांमुळे निर्माण झाला आहे.

यावेळी सूर्याजी सावंत,नवनाथ थोरात,सुदर्शन चपटे,उत्तम पवार,अभिजीत भागवत,तुषार कडुसकर,गजानन भालेराव,प्रशांत रायकर,वसंत भोर,उमेश जाधव,अतुल मनकर,दिपक पठारे,शुभम जेकटे,अक्षय मनकर व मोठ्या संख्येने युवा तरुण सहकारी उपस्थित होते.

गणेश गाडे म्हणाले की,सर्वांना विचारात घेऊन आपण योग्य तो निर्णय घेऊ तुम्ही अनेक वेळा माझं काम पाहिलं आहे मी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे यापुढेही प्रामाणिकपणे काम करत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button