पुणे विभाग

चास गावच्या उपसरपंचपदी मनीषा संतोषकुमार चासकर यांची बिनविरोध निवड

गावविकासासाठी ठाम, आक्रमक आणि परिणामकारक भूमिका घेणार – मनीषा चासकर


घोडेगाव प्रतिनिधी:
चास माऊली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे आज उपसरपंच पदासाठी झालेल्या बिनविरोध निवडणुकीत चास गावचे उद्योजक व माजी उपसरपंच संतोषकुमार चासकर यांच्या सुविद्य पत्नी मनीषा संतोषकुमार चासकर यांची सर्वानुमते उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवडणूक अध्यासी अधिकारी अर्चना दौलत बारवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली गावरे यांनी काम पाहिले. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच मनीषा संतोषकुमार चासकर या उच्चशिक्षित असून, त्यांनी यापूर्वी १४ वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. त्यानंतर समाजसेवेच्या माध्यमातून गावातील शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे.

चास गावाच्या विकासासाठी पुढील काळात पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना संधी देणारे उपक्रम राबवण्यासाठी मनीषा चासकर आक्रमक आणि ठाम पवित्रा घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. गावाच्या प्रश्नांवर थेट निर्णय, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख विकास हेच त्यांच्या कार्याचे मुख्य सूत्र राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button