पुणे विभागमहाराष्ट्र

पुणे महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला धक्का

प्रभाग 9 व 11 मधील उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश

 

पुणे प्रतिनिधी | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील ठाकरे गटाचे बंडखोर व अधिकृत उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

प्रभाग क्रमांक 9 (ड) व (क) मधील उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार (ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, तसेच प्रभाग क्रमांक 11 (अ) मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

हा पक्षप्रवेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करत अभिनंदन केले आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधील भाजप उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत यांच्यासह भाजप नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button