पुणे विभाग

बांगरवाडी येथे हरिनाम सप्ताहाचे सलग ४२ वे वर्ष

बेल्हे | सुधाकर सैद: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या गुप्त विठोबा देवस्थान असणाऱ्या बांगरवाडी गावामध्ये रानदेवीमाता (रेणुकामाता) उत्सवानिमित्ताने शुक्रवार दि.२३/१/२०२६ ते शुक्रवार दि.३०/१/२०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

४१ वर्षापूर्वी वै.ह.भ.प.कोंडाजीबाबा डेरे यांच्या आशिर्वादाने व वै.ह.भ.प.राष्ट्रीय संत शेलारमामा व वै.ह.भ.प.बबनमहाराज चौगुले यांच्या प्रेरणेने रानदेवी माता देवस्थान बांगरवाडी येथे कै.विष्णूबुआ बांगर, कै.कृष्णा बांगर, बाळशिरामबुआ बांगर, भाऊसाहेब कदम अशा अनेक सहका-यांच्या माध्यमातून हा हरिनाम यज्ञ चालू करण्यात आला.असे रानदेवी देवस्थानचे अध्यक्ष वसंत कदम यांनी सांगितले.

या वर्षीही मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करत असताना पहाटे ४ते ६ काकडाभजन, गाथाभजन, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ व रात्री ७ ते ९ किर्तनसेवा होणार असून त्यामध्ये ह.भ.प.गौरीताई सांगळे, अशोक महाराज शिंदे, श्रीकांत महाराज दुराफे, साध्वी वैष्णवी सरस्वतीदिदी, संतोष महाराज बढेकर, रामदास महाराज पाटील, कबीर महाराज आत्तार व काल्याची किर्तनसेवा उमेश महाराज दशरथे यांची होणार आहे तसेच दररोज किर्तनसेवे नंतर थोर अन्नदात्यांकडून महाप्रसाद केला जाणार असून या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चालू ठेवण्याचे काम तरुण पिढीतील रानदेवी देवस्थानचे अध्यक्ष वसंत कदम व बांगरवाडीतील तरुणांनी एकविचाराने व तनमनधनाने चालू ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button